प्रतिनिधी/खेड
तालुक्यातील नांदगाव येथील 57 वर्षीय प्रौढावर खुनी हल्ला झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दिलावर भोकरे असे जखमी प्रौढाचे नाव आहे. जखमी प्रौढास तातडीने उपचारार्थ डेरवण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
या बाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे आपल्या सहकाऱयांसमवेत घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. यामुळे अधिकचा तपशील उपलब्ध होवू शकला नाही. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा नेमक्या कारणांचा शोध घेत आहे.