प्रतिनिधी / रत्नागिरी
कावळा म्हणल कि काळा रंगाचा पक्षी आपल्या सर्वाच्या डोळ्यासमोर येतो पण, तुम्हाला कुणी पांढऱ्या रंगाचा कावळा मी पाहिलाय असं सांगितल्यास तुम्ही काय वेडा आहेस का? म्हणून प्रश्न विचारत त्याची खिल्ली उडवाल. पण, रत्नागिरीपासून जवळच असलेल्या काळबादेवी या गावात सफेद रंगाचा कावळ आढळून आलाय काळबादेवी गावचे रहिवासी असलेल्या शेखर शेट्ये यांच्या घराच्या परिसरात हा कावळ आढळून आला.
त्यानंतर त्याचे व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवरून व्हायरल झाले. शिवाय, या सफेद कावळ्याविषयी चर्चा देखील सुरू झाली. पण, यातील तज्ञ्जांच्या मते हि कोणतीही वेगळी प्रजाती नसून कावळ्यामध्ये झालेल्या अनुवंशिक बदलामुळे त्या कावळ्याचा रंग पांढरा झाला आहे.