संकेत कुलकर्णी / पंढरपूर
जगभरात कोरोनाची वैश्विक महामारी आहे. अशातच कोरोनाबाधितांच्या संपर्कात कुठलाही व्यक्ती संसर्गाच्या भीतीने जात नाही. मृत कोरोना व्यक्तींच्या मृतदेहास पीपीई किट घालूनच स्पर्शिले जाते. मात्र जेव्हा पीपीई किटची निर्मितीही नव्हती. अशा काळात प्लेगच्या साथीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्लेगबाधितांची प्रेतांवर अंत्यसंस्कार करणारे स्वयंसेवक म्हणून काम केले होते, असा संदर्भ सावरकर अभ्यासक तुकाराम चिंचणीकर यांनी तरूण भारत संवादशी सावरकर जयंतीच्या निमित्ताने बोलताना सांगितला.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची देशभरात आज जयंती साजरी होत आहे. अशाच सावरकरांनी प्लेगमध्ये केलेले कार्य आजच्या सद्य स्थितीस काहीसे साधर्म्य साधणारे आहे. याबाबत सावरकर चरित्र अभ्यासक तुकाराम चिंचणीकर यांनी इतिहासातील संदर्भ सांगितले.
कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर्स तसेच आरोग्यविषयक कर्मचारी हे रूग्णांची सुश्रुषा करतात. त्यामुळे यांच्याविषयीची आपुलकीची भावना निर्माण झाली. पण अशी भावना कोरोनायोध्दया शिवाय कुणाबददलही आजच्या काळात वाटत नाही. पण, असे आरोग्यविषयक युध्दात कार्य केलेले व्यक्ती एक नवा अध्याय रचत असतात. इतिहासातही त्यांची नोंद होते.
इतिहासाचे उलगडले पान
साधारणपणे सन 1901 साली भारतामध्ये प्लेगची मोठी साथ होती. अशीच प्लेगची साथ नाशिकांमध्ये होती. त्यावेळी नाशिक जिल्हयातील भगूर या गावांमध्ये राहणा-या विनायक दामोदर सावरकर यांच्या कुंटुबावर देखिल प्लेगने घाला घातला. यामध्ये सुदैवाने स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना प्लेगचा संसर्ग झाला नाही. अशाच काळात सर्वत्र प्लेग निवारणार्थ कार्य सुरू होती. दरम्यान सावरकर यांचे पितामह दामोदर सावरकर यांचे निधन झाले. यानंतर सावरकर यांनी मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि त्यांचे मित्र रामभाउ दातार यांच्या मार्गदर्शनखाली सावरकरांच्या मित्रांनी एकत्र येउन प्लेगग्रस्तांची सुश्रुषा सुरू केली.
स्वतः वाहून नेले प्लेगग्रस्तांचे देह
विशेष म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये प्लेगग्रस्त मृत व्यक्तीची प्रेते वाहून नेण्यासाठी आणि त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वयंसेवकांची कमी होती. अशा काळात सावरकरांनी आपल्या सर्व मित्रांनी घेउन प्लेगग्रस्त मृत व्यक्तींची प्रेते वाहून नेत अंत्यसंस्कार करण्याचे काम केले. हाच इतिहास निश्चितच आजमितीला कोरोनाग्रस्त रूग्णांच्या प्रेताचे अंत्यसंस्कार करणाऱया कोरोनायोध्दयांना बळ देणारा ठरणार आहे.
122 वर्षांपूर्वीचे महान काम
आजच्या जमान्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यविषयक पीपीई किट सारख्या सामग्री उपलब्ध आहेत. पण, अशा कुठल्याही सामग्री 122 वर्षापूर्वी नसताना. प्लेगग्रस्त रूग्णांची प्रेते वाहून नेण्यांचे स्वयंसेवक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कार्य केले. याबाबातचे संदर्भ सावरकरांनीच `माझ्या आठवणी’ या आत्मचरित्रापर ग्रंथामध्ये नमूद केले आहेत. – तुकाराम चिंचणीकर , सावरकर अभ्यासक