जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांना मिळणार स्पेक्ट्रम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या जगभरात अत्याधुनिक सुविधांच्या वाढत्या वापरामुळे नवीन संवादांच्या सुविधा निर्माण होत आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी 5-जी नेटवर्कची सेवा लागू करण्यासाठी चांगली सेवा उपलब्ध होत आहे. या संदर्भात डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (डीओटी) यांनी देशातील तीन प्रमुख कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांचा 5 जी स्पेक्ट्रमचा प्रस्ताव प्राप्त होणार असल्याचे म्हटले आहे.
सदर कंपन्यांना स्पेक्ट्रम प्राप्त होत गेल्यास देशातील 5 जी सेवेच्या करण्यात येणाऱया चाचणीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत. पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डीओटीने दूरसंचार कंपन्यांकडून 700 मेगाहर्टज, 3.5 गीगाहर्ट आणि 26 गीगाहर्टज ब्रँडसह स्पेक्ट्रमचा प्रस्ताव करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांपासून 5 जी चाचणीसाठी यासंदर्भात तयारी सुरु आहे.
जिओ-एअरटेलसाठी महत्वपूर्ण प्रस्ताव
5-जी चाचणी स्पेक्ट्रम प्रस्तावासाठी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसाठी महत्वपूर्ण आहे. कारण या दोन्ही कंपन्यांजवळ 5-जी नेटवर्कची साधनसामुग्री तयार आहे. दोन्ही कंपन्यांच्या डाटा वापरात लॉकडाऊनमुळे मोठी वाढ झाली आहे.
13 प्रस्तावांना मंजुरी
चालू महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार डीओटीने 5 जी चाचणीसाठी 13 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. चाचणीकरीता डीओटीला एकूण 16 प्रस्ताव प्राप्त झाले होते.