प्रतिनिधी / बेळगाव
पशुसंगोपन खात्यातर्फे दरवर्षी दोन टप्प्यात लाळखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाते. साधारण पहिल्या टप्प्यात राबविली जाणारी मोहीम अद्याप कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. जनावरांचा साथीच्या आजारांपासून बचाव व्हावा, यासाठी पावसाळय़ाच्या तोंडावर लसीकरण मोहीम राबविली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रतिबंधक लसीकरणापासून जनावरांना वंचित रहावे लागले आहे.
खात्याकडून वेगवेगळय़ा ऋतूमध्ये पशुधनासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली जाते. घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात घेऊन लसीकरण मोहीम राबवली जाते. घटसर्प, फऱया व लाळखुरकत आदी लसीकरण करण्यात येते. पावसाळय़ाच्या तोंडावर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. मात्र, कोरोनामुळे प्रतिबंधक लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. जिल्हय़ात 28,09,109 तर तालुक्मयात 1,78,075 इतकी जनावरांची संख्या आहे. गाय, बैल, म्हैस, मेंढी, शेळी आदी जनावरे लसीकरणापासून वंचित आहेत.
राष्ट्रीय जनावरांतील रोग नियंत्रण मोहिमेअंतर्गत राज्य सरकारकडून ही मोहीम राबविली जाते. दूधउत्पादक शेतकऱयांच्या जनावरांना वेळेत उपचार व सोयी-सुविधा पुरविण्याबरोबर प्रतिबंधक लसीदेखील दिल्या जातात. पावसाळय़ाच्या तोंडावर ओल्या चाऱयातून विविध रोगांची जनावरांना लागण होत असते. त्यामुळे पशुसंगोपन खात्याने प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे.
विविध रोगाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी पशुसंगोपन खात्याकडून दरवर्षी शेतकऱयांच्या घरोघरी जाऊन जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहीम ठप्प झाली आहे. वर्षातील पहिला टप्पा अद्याप झाला नसून दुसऱया टप्प्यालाही विलंब होण्याची शक्मयता आहे.