प्रतिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 759 नवे रूग्ण आढळून आले. तसेच 1 हजार 559 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 15 हजार 433 वर पोहोचली आहे. जिल्हय़ात रविवारीही कोरोना मृत्यूसंख्या व नव्या रूग्णांतही घट झाल्याचे समोर आले आहे. सक्रीय रूग्णसंख्या मात्र वाढतच आहे.
जिल्हय़ात रविवारी कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 672 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 905, नगरपालिका क्षेत्रात 584, शहरात 738 तर अन्य 445 आहेत. मृतांमध्ये परजिल्हय़ांतील 6 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 559 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 92 हजार 245 झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 759 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 36, भुदरगड 55, चंदगड 37, गडहिंग्लज 56, गगनबावडा 5, हातकणंगले 203, कागल 62, करवीर 336, पन्हाळा 147, राधानगरी 20, शाहूवाडी 22, शिरोळ 56, नगरपालिका क्षेत्रात 136, कोल्हापुरात 477 तर अन्य 111 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 11 हजार 350 झाली आहे.
दिवसभरात अधिक स्वॅबची तपासणी
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 2 हजार 562 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 149 निगेटिव्हआहेत. अॅन्टीजेनटेस्टचे 4 हजार 445 अहवाल आले. त्यातील 3 हजार 873 निगेटिव्हआहेत. ट्रुनेट टेस्टचे 3 हजार 49 रिपोर्ट आले. त्यातील 2 हजार 193 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 10 हजारांवर स्वॅब रिपोर्ट आले.
कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 477 1282 1759
आजपर्यतचे बाधीत 32229 79131 1,11,350
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1559 92245
दिवसभरातील मृत्यू 3 34 37
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 738 2834 3672
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 331 2149 2562
अँटीजेन 572. 3873 4445
ट्रुनेट 856 2193 3049
Previous Articleआशियाई लोकांबद्दल बायडेन यांचा महत्त्वाचा निर्णय
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.