ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयाचे स्पष्ट प्रतिपादन
लखनौ / वृत्तसंस्था
जानेवारी ते एप्रिल या काळात उत्तराखंडात हरिद्वार येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला कुंभमेळा हा कोरोनाचा महाप्रसारक ठरला, असा आरोप केला जात आहे. तथापि, कुंभमेळय़ामुळे कोरोनाचा प्रसार झालेला नाही, ही बाब ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केली आहे.
पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी यासंबंधी माहिती दिली. कुंभमेळय़ाला जमलेल्या भाविकांच्या मोठय़ा प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कुंभमेळा 1 जानेवारी ते 30 एप्रिल या काळात चालला. या अवधीत 8 लाख 91 हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी केवळ 1 हजार 954 चाचण्या सकारात्मक (कोरोना असल्याचे दाखविणाऱया) होत्या. हे प्रमाण 0.2 टक्के म्हणजेच हजारामध्ये 2 असे आहे. या कुंभमेळय़ासाठी 16 हजार पोलीस नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्यामधील 0.5 टक्के पोलीसांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुरक्षेसाठी नियुक्त असणारे पोलीस भाविकांच्या संपर्कात नेहमी येत असतात. तरीही त्यांच्यात कोरोनाचे प्रमाण इतके कमी होते. भाविकांमधील कोरोना बाधितांची संख्या आणि कोरोनाबाधित पोलिसांची संख्या इतकी कमी आहे की राष्ट्रीय व राज्यस्तरीय सरासरी त्यापेक्षा बरीच जास्त आहे. त्यामुळे कुंभमेळय़ामुळे कोरोनाचा प्रसार झाला हा आरोप हेपुपुरस्सर आणि विशिष्ट हेतू मनात ठेवून करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असे गुंज्याल यांनी स्पष्ट केले.