मुंबई / वृत्तसंस्था
रणजी चषक स्पर्धेतील दिग्गज खेळाडू व मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजूमदार याची मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली. रमेश पोवार यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबईचे प्रशिक्षकपद रिक्त होते. बलविंदर सिंग संधू, वासिम जाफर, साईराज बहुतुले, सुलक्षण कुलकर्णी, प्रदीप सुंदरम, नंदन फडणीस, उमेश पटवाल व विनोद राघवन हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. 46 वर्षीय अमोल मुजूमदारने 1993 ते 2013 या कालावधीत 171 प्रथमश्रेणी सामन्यात 11167 धावांचे योगदान दिले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, आयपीएल प्रँचायझी राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक व दक्षिण आफ्रिकन संघासाठी अंतरिम फलंदाजी सल्लागार म्हणून त्याने काम पाहिले आहे.