ग्राहकांसाठी विविध अत्याधुनिक सुविधा होणार उपलब्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍपलने आयओएस 14.6 सॉफ्टवेअरचे सादरीकरण केले आहे. आधुनिक बदलांसह सदरचे सॉफ्टवेअर सादर केले आहे. जगभरात वेगळय़ा फिचर्सच्या आधारे सेवा देण्यात अग्रेसर असणारी कंपनी म्हणून ऍपलचा डंका आहे.
1.मास्क न काढता उघडणार लॉक
कोरोना महामारीच्या लढाईमध्ये मास्क घालणे आवश्यक झाले आहे. यासाठीच ऍपलने एक नवीन फिचर सादर केले आहे. यामध्ये मास्क काढल्यानंतर आपोआप फोन अनलॉक होणार आहे.
2.पिक्चर इन पिक्चर फिचर
ऍपलचे पिक्चर इन पिक्चर मोड फिचर आयओएस 14 मध्ये सहजपणे चालविले जाते. याच्यासह आपला व्हिडीओ पाहताना इंटरनेट ब्राउजही करण्याची सोय मिळणार आहे. तसेच मेसेजही वाचता येणार आहे.
3.ऍपमधून ऍड काढता येणार
ऍपलने आपल्या आयओएस 14.5 सोबत नवीन फिचर आणले आहे. ज्यामध्ये काही ऍप्स ऍक्सेप्ट करण्याअगोदरच त्यांचा वापर करता येणार आहे. ज्यामध्ये त्या ऍपवरील ऍड बंद करण्याची सोय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
4.बॅटरीची क्षमता समजणार
सदर फिचरमध्ये आयफोन 11 आवृत्तीमध्ये ग्राहकांना मोबाईलमधील बॅटरीची क्षमता समजू शकणार आहे. या फिचरला आयओएस 14.5 सोबत बॅटरीची जोडणी केली आहे.
5. गाणी सहज सर्च करता येणार
ग्राहक आयओएस 14.6 सोबत ऍप क्लिपमधून गाण्यांचा शोध घेता येणार आहे. यावर म्युझिक संदर्भात माहिती मिळणार आहे.