बेळगाव
कर्नाटक राज्य सरकारने 14 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात बँकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बँका खुल्या राहणार असल्याची माहिती शिखर बँकेचे समन्वयक बी. चंद्रशेखर राव
यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
7 ते 11 जूनपर्यंत हा नवीन नियम लागू असणार आहे. यापूर्वी दुपारी 2 पर्यंत वेळ देण्यात आली होती. परंतु मर्यादित वेळेमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.