अत्याधुनिक सुविधा ग्राहकांसाठी होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
करदात्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता प्राप्तिकर परतावा(आयटी) भरण्यासाठी अधिकची वाट पहावी लागणार नाही. नवीन www.incometax.gov.in या वेबसाईटचे लाँचिंग केले आहे. यामध्ये टॅक्सपेयर्सला आयटीआर पेमेंट सहजपणे करता येणार आहे. यासोबतच यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवीन पोर्टल हे अधिक युजर पेंडली असून यासोबत नवे फिचर्स जोडण्यात आले आहेत. नवे पोर्टल हे सोमवारपासून लाईव्ह झाले आहे. यामध्ये नवीन कर प्रणाली 18 जूनपासून सुरु होणार आहे. प्राप्तिकर विभागाचा दावा आहे, की नवीन वेबसाईट अधिक सोयीस्कर आणि युजर प्रेन्डली आहे. ज्यामध्ये आयटीआर फाईल करण्यास प्राप्तिकर दात्यांना सोपे होणार आहे.
काय-काय मिळणार सुविधा
ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्थितीमध्ये आयटीआरसाठी तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध होणार आहे. यामध्ये करदात्यांना असिस्ट करण्याची सुविधाही मिळणार आहे. यासह प्री फायलिंगचाही पर्याय मिळणार आहे.
नवीन टॅक्स ई फायलिंग पोर्टलच्या विशेष बाबी
1.नवीन ई फायलिंग पोर्टलमध्ये त्वरित आयटी रिटर्न प्रक्रियेची सुविधा मिळणार आहे. यामध्ये टॅक्सपेयर्सला लवकरच मिळतो परतावा.
2.पोर्टलवर लॉगिनवर एक डॅशबोर्ड राहणार असून त्यावर आवश्यक ती माहिती अपलोड, पेंडिंग काम पाहता येणार आहे.
3.मोफत इनकम टॅक्स परतावा तयार करण्याचे सॉफ्टवेअर मिळणार असून ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध होणार आहे.
4.नवीन पोर्टलवर नवीन ऑनलाईन टॅक्स पेमेंट सिस्टम असणार आहे, ज्यामध्ये बँकिंग, युपीआय, क्रेडिट कार्ड आणि आरटीजीएस व एनइएफटीच्या सुविधा मिळणार आहेत.
5.करदात्यांच्या मदतीसाठी नवीन कॉल सेंटर तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एफएक्यूएस, टय़ुटोरियल्स, व्हिडीओसह अन्य सेवा राहणार
6.डेस्कटॉपवर उपलब्ध सर्व कराचे ई-फायलिंग पोर्टल फक्शन्स मोबाईल ऍपवर उपलब्ध करता येणार आहे.