उन्हात होते चार्ज, उद्योगपतींनाही पडली भुरळ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत 7 युवक एका वाहनातून प्रवास करताना दिसून येत आहेत. हे वाहन दिसण्यास बाइकसारखे आहे. हे वाहन भंगारातून तयार करण्यात आल्याचा दावा आहे. हा व्हिडिओ उद्योजक आणि आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे.
एका प्रॉडक्टमध्ये इतकी वैशिष्टय़े, स्पॅपद्वारे तयार झालेली 7 सीटर, सौरऊर्जेने धावणारी, अशाप्रकारच्या कमी खर्चात तयार होणारे प्रॉडक्ट मला भारतावर गर्व करण्यासाठी प्रेरित करते असे गोयंका यांनी याच्या कॅप्शनदाखल नमूद केले आहे. या व्हिडिओला आतार्पंत 1.5 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. शेकडो युजर्सनी यावर कॉमेंट केली आहे. भारत हा जुगाड प्रधान देश आहे असे काहींनी म्हटले आहे.
ही बाइक 7 सीटर असून ती सौरऊर्जेने चार्ज होत 200 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. बाइकवर सोलर पॅनेल जोडण्यात आला असून तो उन्हापासून प्रवाशांना वाचवितो असे एक युवक सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. हा बाइकच्या निर्मितीकरता 10-12 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
भंगारातून तयार केलेल्या 7 सीटर वाहनाचे डिझाइन आकर्षक असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱया युजरने पेट्रोल, डिझेलशिवाय धावणाऱया या बाइकला केवळ सूर्यप्रकाश पुरेसा असल्याचे नमूद केले आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. माणसाला एखाद्या गोष्टीची गरज काहीतरी नवीन शोध घ्यायला भाग पाडते. शिवाय अनेक लोक गरजेसाठी नवनवीन शोध लावतात, ज्याला आपण देशी जुगाड म्हणतो. आपल्या देशात असे जुगाड करणाऱयांची संख्या कमी नाही. हे वाहन अशाचप्रकारे एक जुगाड असून त्याची भुरळ आता उद्योगपतींनाही पडत आहे.