शिरोळ/प्रतिनिधी
ऊस दरवाढ मागणी प्रश्न आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चिडमुगे यांच्यासह 15 कार्यकर्त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळ ते नरसोबावाडी रोडवर शिरटी फाटा येथील दर्शन हॉटेल समोर संघटनेने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवले होते. संघटनेचे प्रमुख धनाजी चुरमुंगे व सपकाऱ्यांना बेकायदेशीर वाहने अडवू नये म्हणून सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस लागू केली होती.
संघटनेच्या वतीने थांबवण्यात आलेली उसाची वाहने ट्रॅक्टर चालक हे आज दि. 28 रोजी कारखान्याकडे घेऊन जात असताना पुन्हा संघटनेच्या वतीने बेकायदेशीर थांबवण्यात आल्याने ट्रॅक्टर चालक बाळासो कमलसिद्ध बुरुंगले (रा. सांगलीवाडी) यांनी संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे, महेश जाधव, योगेश जाधव, प्रवीण माने सर्व (रा. शिरोळ) व इतर 08 ते 10 लोकांविरुद्ध फिर्याद दिल्याने शिरोळ पोलीस ठाणे गु. र. न.नंबर २१७/२०२२, भादविस्कलम ३४१,१४३,१४७,१४९,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांच्यासह मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.