पुलाची शिरोली प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथील फरहान ईरफान मुल्ला (वय ८ वर्ष),हा गतिमंद मुलगा तलावातील पाण्यात बुडून मयत झाला.ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
फरहान हा गतिमंद असल्याने तो घरातून बाहेर कोठेही फिरत असायचा.फिरून झाल्यानंतर परत घरी यायचा. पण बुधवारी सकाळी घरातून बाहेर गेलेला फरहान परत आला नाही.यावेळी नातेवाईकांनी संपूर्ण गावात शोध घेतला असता तो सापडला नाही. शुक्रवारी सकाळी कांही तरुण गाव तलावाजवळ फिरत असता त्यांना मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला त्यांनी ही माहिती त्याच्या मामाला सांगितली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता फरहान असल्याचे निदर्शनास आले.