11 दिवसांमध्ये पूर्ण केला प्रवास बार-टेल्ड गॉडविटचा विश्वविक्रम
बार-टेल्ड गॉडविट पक्ष्याच्या नावावर अनोखा विश्वविक्रम नोंदविला गेला ओ. केवळ 5 महिन्यांच्या या पक्षाने अलास्काहून ऑस्ट्रेलियाच्या टास्मानियापर्यंतचा 13 हजार 560 किलोमीटरचा प्रवास केला आहे. हा प्रवास या पक्ष्याने सलग 11 दिवसांपर्यंत उड्डाण करत पूर्ण केला आहे. हा पक्षी प्रवासादरम्यान कुठेच थांबला नाही. बार-टेल्डने उड्डाणाची सुरुवात 13 ऑक्टोबर रोजी अलास्का येथे केली होती आणि 25 ऑक्टोबर रोजी हा प्रवास पूर्ण केला आहे.
सॅटेलाइट टॅगद्वारे ट्रकिंग
उड्डाणाचा विक्रम नोंदविण्यासाठी पक्ष्याच्या शरीरावर सॅटेलाइट टॅग लावण्यात आला होता. वैज्ञानिकांनी या 5-जी टॅगला ट्रक केले, याचा क्रमांक 2324684 होता. या पक्षाने हा मॅराथॉन प्रवास न थांबता 25 ऑक्टोबर रोजी पूर्ण केला ओ. बार-टेल्ड गॉडविट पक्षी या प्रवासादरम्यान ओशिनिया, वानुअतु आणि न्यू केलडोनिया बेटांवरून गेला आहे. हा पक्षी थेट टास्मानियातच विसावला आहे.
मागील वर्षीही विक्रम
बार-टेल्ड गॉडविट प्रजातीच्या पक्ष्याने यापूर्वीही विक्रम नोंदविला आहे. 2020 मध्ये या प्रजातीच्या एका पक्ष्याने 12 हजार किलोमीटरचे अंतर 11 दिवसांत पूर्ण केले होते. पक्ष्याने हे अंतर अलास्काहून न्यूझीलंडरम्यान कापून विश्वविक्रम केला होता. प्रवासादरम्यान पक्ष्याने काहीच खाल्ले नव्हते. त्यानंतर 2021 मध्ये याच प्रजातीच्या एका पक्ष्याने 13 हजार 50 किमीचे अंतर कापून विश्वविक्रम केला होता. गॉडविटचे शरीर लढाऊ विमानासारखे आहे. लांब-टोकदार पंख या पक्ष्याला वेगाने उडण्याची क्षमता देत असल्याचे उद्गार पक्षी स्थलांतरावर संशोधन करणाऱया वैज्ञानिक डॉ. जेसी कॉन्कलिन यांनी काढले आहेत.
प्रवासापूर्वीचा आहार
गॉडविट पक्ष्याने उड्डाणापूर्वी दोन महिन्यांपर्यंत किडे आणि अन्य किटक फस्त केले होते. प्रवासादरम्यान या पक्ष्याने 88 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण केले होते. हवेत उडताना हा पक्षी स्वतःच्या शरीराला आंकुचित करून घेत असल्याने याचे शरीर अत्यंत छोटे होते आणि हेच वैशिष्टय़ या पक्ष्याला उड्डाणावेळी मदत करते.
230 ते 450 ग्रॅम वजन
गॉडविट पक्ष्याचे वजन 230 ते 450 ग्रॅमदरम्यान असते. याच्या पंखांची रुंदी 70 ते 80 सेंटीमीटर इतकी असते. एका प्रौढ गॉडविटची लांबी 37 ते 39 सेंटीमीटरदरम्यान असते. पक्ष्यांची ही प्रजाती प्रामुख्याने अलास्कामध्ये आढळून येते. परंतु स्थलांतरामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही या पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येते.