प्रतिनिधी/ बेळगाव
जुनेबेळगाव येथील शिवतलवार युवक मंडळातर्फे शिंदे मैदान येथे 60 ते 70 फूट लांब राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. माती व दगड यांचा वापर करत तऊणांनी महिनाभर परिश्रम करत हा भव्य दिव्य किल्ला साकारला आहे. किल्ला पाहण्यासाठी बेळगाव परिसरातील शिवभक्त या ठिकाणी दाखल होत आहेत.
शिवतलवार युवक मंडळ दरवर्षी भव्य किल्ला साकारते. यापूर्वीही या मंडळाने देशातील अनेक किल्ले साकारले आहेत. यावर्षी या मंडळाने राजगडाची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाच्या पाच युवकांनी महिनाभर परिश्रम व माती, दगड जमा करत भव्य किल्ला तयार केला. डिसेंबर अखेरपर्यंत हा किल्ला नागरिकांना पाहता येणार आहे. नागरिकांनी या किल्ल्याला भेट देऊन इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.