धामणी खोऱ्यातील वेतवडे (ता.पन्हाळा) येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय आनंदा जाधव (वय- ४८,रा.पिंपळवाडी,ता.राधानगरी) यांनी शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कळे पोलिसात तक्रार नोंद करण्यात आला आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर अल्पवयीन पीडित मुलगी ही वेतवडे येथे नाझरे हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. नुकतीच पीडित मुलीने दहावीची परीक्षा दिली असून संशयित आरोपी शिक्षक दत्तात्रय जाधव हा सदर शाळेच्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. जाधव याने गेल्या १५ दिवसांपासून पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्या इच्छे विरुध्द इच्छा व्यक्त करत तिचा विनयभंग केला. तसेच रात्री ११ नंतर पीडित मुलीच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज पाठवून त्रास देत असल्याचे ही तक्रारीत म्हटले आहे.सदर मुख्याध्यापक जाधव याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने कळे पोलिसात फिर्याद दिली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे व कळे पोलिस करत आहेत.
अखेर कर्माचा घड़ा भरलाच… !
आरोपी मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांनी या अगोदरही शाळेतील मुलींचा विनयभंग केल्याची चर्चा धामणी खोऱ्यात आहे. मात्र कोणीही त्याच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. त्यामुळे दत्तात्रय याचे धाडस वाढले होते. तसेच जाधव याच्या अनेक नाजूक प्रकरणांची चर्चा सर्वत्र होत आहे. तसेच संबंधित जाधव याची पत्नी ही सदर शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत आहे.