बेळगावातील प्रसिद्ध कांदा मार्केटच्या जागेबाबत पुन्हा नवीन वळण मिळाले आहे. कांदा मार्केटची जागा कांदा मार्केट अससोसिएशन व इनामदार फ़ॅमिलीची असल्याचा दावा करण्यात आला होता. पण याला आता नवीन वळण मिळाले आहे.
सादर जागा कायदेशिर कागदपत्रानुसार आपली असल्याचा दावा एजाज अहमदी यांनी केला आहे. यापूर्वी लतिफखान पठाण,अजीम पाशा इनामदार व अन्य नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन जागेची मालकी सैयद इनामदार फ़ॅमिलीची असल्याचा दावा केला होता. पण कागदपत्रानुसार ती मालमत्ता आमच्या मालकीची असून त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चुकीची आणि खोटी आहे. २ एकर २१ गुंठ्यांपैकी महापालिकेला १८५६ मध्ये १ एकर ३८ गुंठे जागा लीजवर दिली होती. उर्वरित जागा आमच्या कब्जात आहे. असा दावा देखील एजाज अहमदी यांनी केला. मिलन हॉटेल येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.