प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-कडोली मार्गावर अगसगा क्रॉसवर कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. शहरी भागातीलच कचरा अंधाराचा फायदा घेऊन टाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
अगसगा क्रॉस येथील चढतीलाच रस्त्याशेजारी कचऱयाचा ढीग जमा झाला आहे. यामध्ये प्लास्टिक, टाकाऊ पदार्थ, मेलेली जनावरे टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे. वाहनधारकांना नाक धरूनच ये-जा करावी लागत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने कचरा टाकण्यात येत असल्याने हा परिसर ‘डंपिंग ग्राऊंड’ बनण्याची भीती व्यक्त होत आहे. कचरा भटक्मया कुत्र्यांनी आणि जनावरांनी विस्कटल्यामुळे परिसराला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचत आहे. तातडीने कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. अगसगा क्रॉसवर असलेल्या दिशादर्शक फलकाची दुर्दशा झाली आहे. अवजड वाहनाची धडक बसून हा फलक मोडला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. तातडीने या ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक उभारावा, अशी मागणी होत आहे.