ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देवदर्शन करून तुळजापूरहून पुण्याकडे जाणारी भरधाव वेगातील खाजगी बस खड्डयात उलटली. दौंड तालुक्यातील मळद येथे आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी आहेत. त्यामधील तीनजण गंभीर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानीपेठ, लोहियानगर येथील 55 ते 60 भाविक चैत्र पौर्णिमेनिमित्त खाजगी बसने तुळजापूर व यरमाळा येथील देवीच्या दर्शनाला गेले होते. देवदर्शन करून पुण्याकडे परत असताना दौड तालुक्यातील मळद हद्दीतील घागरेवस्तीजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. मळद परिसरातील अनेक तरूणांनी बसमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बसमध्ये प्रवाशी अंगावर पडून खाली सापडल्याने एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. त्यामधील दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. जखमींना उपचारासाठी दौंड व भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, बस चालकाने मद्यपान केल्याचे समोर आले आहे. दौंड पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : नॉट रिचेबल अजित पवार पोहोचले थेट सोन्याच्या दुकानात