कर्ज घेऊ इच्छिणाऱयाचे भाग्य उजळले
कोची / वृत्तसंस्था
केरळमधील एका तीस वषीय रिक्षाचालकाला 25 कोटी रुपयांची बंपर लॉटरी लागली आहे. अनूप बी असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्याने शनिवारीच लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजे रविवारीच सोडत निघाल्यानंतर रिक्षाचालक विजेता ठरल्याचे स्पष्ट झाले. अनूपला कर कपातीनंतर 15 कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. अखेरच्या टप्प्यात आपल्याकडे लॉटरी खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. मी मुलाने जमा केलेल्या पैशातून शनिवारी लॉटरी खरेदी केली होती, असे हर्षोल्हासित झालेल्या रिक्षाचालकाने स्पष्ट केले आहे.
अनूप बी हा केरळमधील श्रीवरहम येथील रहिवासी असून तो एका हॉटेलमध्ये कामाला होता. अलीकडेच कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्याने रिक्षा चालवण्यास सुरूवात केली होती. तसेच भविष्यातील आर्थिक समस्या भागविण्यासाठी तो मलेशियातील एका हॉटेलमध्ये काम करण्यास जाण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याने व्हिसासाठी अर्जही केला होता. पुढील आठवडय़ात त्याला मलेशियाला जाण्याची अनुमती मिळण्याची आशा होती. विदेशात जाताना अधिकचे पैसे लागतील यासाठी त्याने बँकेकडे कर्जासाठीही अर्ज केला होता. पण, कर्ज मिळण्यापूर्वी लॉटरी लागल्याने तो ‘करोडपती’ झाला आहे. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालात त्याला 25 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे घोषित करण्यात आले. कोटय़वधींची लॉटरी लागल्यामुळे त्याचे भाग्य फळफळले आहे.