गुवाहाटी
आसामच्या तमुलपूर येथील फायरिंग रेंजमध्ये झालेल्या विस्फोटात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. सेवेदरम्यान झालेल्या स्फोटात सैनिक संदीप कुमार जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान संदीप कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. विस्फोटामागील कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. सैन्याकडून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.