बेळगाव : सीपीएड मैदानावर भरलेल्या सी-टनेल अॅक्वारियम प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. हे भव्य असे अॅक्वारियन प्रदर्शन विविध प्रजातींच्या दुर्मीळ माशांचे दर्शन घडविते. या प्रदर्शनात एंजलफिश, क्लाउनफिश, सी-हॉर्स, बॉक्सफिश, काउफिश, ईल, रॉस आणि सामान्य सागरी जीवांसह विदेशी प्रजातींचे निरीक्षण करता येते. जलचर जीवनाची सफारीही अनुभवता येते. मत्स्यालयात गोड्या पाण्यातील प्रजातींचे मूळ समुद्री प्रजाती आणि संवर्धनाची गरज असलेल्या प्रजातींचा येथे समावेश आहे. पाण्याखालील अॅक्वा बोगदा आणि वरच्या बाजूला असलेल्या गॅलरीमुळे प्रदर्शन पाहणे सोपे होते. अॅक्वारियममध्ये कोई, एंजेलफिश, स्कॉर्पियन फिशसह बरेच विदेशी मासे पाहायला मिळतात. सदर प्रदर्शनाला बेळगाव, महाराष्ट्र, गोवा येथील नागरिकांनी लहान मुलांसह भेट देऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता मोजकेच दिवस प्रदर्शन उपलब्ध राहणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleबियाणांचे वितरण-पूर नियंत्रणासाठी सज्ज रहा!
Next Article आरपीडीच्या प्राचार्यपदी डॉ.अभय पाटील
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.