मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उपोषण
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे आक्रमक नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय . आ. वैभव नाईक यांच्यासह ,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत ,सुशांत नाईक,बाळा गावडे यांच्यासह बहुसंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थित राहून उपोषणला पाठींबा दिला. यावेळी राष्ट्रवादीचे भास्कर परब , नाझिर शेख,पुंडलिक दळवी उपस्थित होते.