वृत्तसंस्था/ होबार्ट (ऑस्ट्रेलिया)
येथे सुरू असलेल्या बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेतील झालेल्या सामन्यात रिले मेरेडिथ आणि शदाब खान यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर होबार्ट हरिकेन्सने मेलबर्न रिनेगेड्सचा 8 धावांनी पराभव केला. या विजयामुळे होबार्ट हरिकेन्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 4 गुणासह चौथे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत मेलबर्न रिनेगेडस् सहा गुणासह दुसऱया स्थानावर आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्सचा डाव 18 षटकात 122 धावात आटोपला. नीशमने 28 तर कर्णधार नाथन इलिसने 21 धावा जमवल्या. मेलबर्न रिनेगेड्सतर्फे डेविड मुडी आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर मेलबर्न रिनेगेड्सचा डाव 19.2 षटकात 114 धावात आटोपला. मेरेडिथने 12 धावात 3 तर शदाब खानने 3 तसेच पॅरीस आणि डुले यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.