परतीच्या पावसाचा बसला तडाखा
डिगस-प्रतिनिधी
आज सकाळपासून सुरु झालेल्या परतीच्या पावसाचा तडाखा डिगस गावाला बसला असुन डिगस करिवणे टेंब येथील कृष्णा सखाराम पवार यांच्या घरावर आंब्याचे मोठे झाड विद्युतवहिनीच्या पोला सकट घरावर कोसळले. यात त्यांच्या घराला तडे जाऊन मोठे नुकसान झाले . सुदैवाने घरात असणाऱ्या कोणाला कोणताही दुखापत झाली नाही.आज पहाटेपासून सुरु झालेल्या वारा व पाऊस यामुळे हे आंब्याचे झाड त्याच्या घरावर कोसळले.कोसळून पडलेल्या या झाडामुळे घराचे अंदाजे 20 ते 25 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी डिगस सरपंच ,पोलीस पाटील यांनी तात्काळ भेट देत पंचनाम करण्याचे आश्वासन दिले .