आपले जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. विज्ञान आश्चर्य किंवा चमत्कार मानत नाही. तथापि, काही घटना अशा असतात की त्या समजून घेण्यासाठी माणसाची तर्कबुद्धी किंवा विश्लेषण क्षमता पुरेशी पडत नाही. अशा कैक घटना किंवा दृष्ये आपल्याला दिसतात. यातील काही प्रसिद्ध होतात आणि चर्चेचा विषय बनतात, तर काहींना तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही.
इटली देशातील बकोलीनजीक बाईट या प्राचीन शहरात एका जुना रोमन आर्कवे आहे. या आर्कवेच्या खालच्या भागात एक झाड या आर्कवेच्या आधाराने उलटे उगविलेले आहे. उलटे, याचा अर्थ असा की त्याची मुळे या आर्कवेच्या खालच्या भागात असून त्याचा शेंडा आणि फांद्या जमितीच्या दिशेने वाढलेल्या आहेत. या झाडाची वाढही सामान्य झाडे जशी खालून वर वाढत जातात तशी न होता वरुन खाली अशी होत आहे. हे झाड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले असून हजारो लोक प्रतिदिन हे अनोखे झाड पाहण्यासाठी दूरदूरुन येतात.
हे झाड या आर्कवेच्या खालच्या बाजूस कसे उगवले हे कोणीही सांगू शकत नाही. तेथे या झाडाचे बीज रुजले कसे हे देखील समजलेले नाही. पण हा वृक्ष अगदी व्यवस्थितरित्या वाढला असून त्याचा शेंडा काही वर्षांमध्ये खालच्या जमिनीला चिकटेल अशी शक्यता आहे. हा वृत्त तोडण्यास प्रतिबंध आहे.