ऑनलाईन टीम / तरुण भारत
रेल्वे डब्यावर चढून आत्महत्या करायला गेलेला तरुण विद्युत तारांना चिकटून होरपळल्याची घटना आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर घडली. संबंधित तरुण 70 ते 80 भाजला गेला असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक तरुण आज सकाळी पुणे-गोरखपूर रेल्वेच्या डब्यावर चढला. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही. डब्यावरील हायव्होल्टेज विद्युत तारेला त्याने स्पर्श केल्याने मोठा जाळ झाला. त्यावेळी तरुण खाली फेकला गेला. रेल्वेचे एससी मॅकॅनिकल विजय बऱहाटे यांनी तात्काळ अंगातील जॅकेट काढून तरुणाला लागलेली आग विझवली. त्यानंतर प्राथमिक उपचार करत तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित तरुणाचे नाव अद्याप समजू शकले नाही.
अधिक वाचा : व्यापाऱ्याला मारण्याची धमकी, छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा