वेंगुर्ले /वार्ताहर-
शासनाने प्लॉस्टीक बंदी बाबत नवीन नियमांप्रमाणे कमी मायक्रॉनच्या प्लॉस्टीक वापरावर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांचा माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे. तसेच पहिल्या गुन्ह्यासाठी रू. 5 हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रू. 10 हजार तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी रू. 25 हजार व 3 माfहन्याbचा कारावास अशी कारवाई नगरपरीषदेमार्फत सुरू केलेली असून वेंगुर्ले शहरातील सर्व प्रकारचे व्यावसायिक व नागरीकांनी प्लॉटीक बंदीचा नियम मोडू नये. असे आवाहन वेंगुर्ले नगरपरीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.सुधारीत प्लॉस्टीक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4 (2) अन्वये 1 जूलै पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारीत पॉलीस्टीरीनसह खालील सिंगल युज प्लॉस्टीकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्रीआणि वापरावर बंदी असेल. तसेच प्लॉस्टीकच्या कांडय़ासह कान कोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टीकच्या कांडय़ा, प्लॉस्टीकचे झेंडे, कँन्डी, कांडय़ा, आईस्क्रीम कांडय़ा, सजावटीसाठी प्लॉस्टीक व पॉलीस्टीरीन (थर्माकोल), प्लेटस कप, ग्लासेस, गटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या ( स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटाभोवती प्लॉस्टीक फिल्म गुंडाळणे, किंवा पॅक करणे, प्लॉस्टीकच्या पीव्हीसी (100 मायक्रॉन पेक्षा कमी) या बरोबरच महाराष्ट्र प्लॉस्टीक व थर्माकोल अधिसुचना 2018 अंतर्गत खालील अतिरीक्त एकल वापर प्लॉस्टीकचा वापर मार्च 2018 पासून प्रतिबंधित आहेत.सर्व प्रकारच्या प्लॉस्टीकच्या पिशव्या (कॅरी बँग) हँण्डल असलेल्या व नसलेल्या. कंपोस्टेबल प्लॉस्टीक (कचरा व नर्सरीसाठी पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या नॉन – ओव्हन बँiस (पॉलीप्रोपीलीनपासून बनविलेले), एकल वापर प्लॉस्टीकचे उत्पादन -डीश, बाऊल, कॅन्टेनर (डबे) (हॉटेल अन्नपदार्थ पॅकेजिंग करीता) यांचेवर कारवाई होऊ शकते.