टाटा टेकशी संबंधीत आयपीओ राहणार
नवी दिल्ली
टाटा समूहाची टेक कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज देशांतर्गत बाजारात लिस्ट करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आयपीओद्वारे पैसे उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज सादर केलेला आहे.
कंपनी याद्वारे विद्यमान प्रवर्तक आणि भागधारकांना 9.57 कोटी समभाग विकणार आहे. टाटा समूहाची आणखी एक कंपनी टाटा प्ले देखील आयपीओची तयारी करत आहे. समूह कंपनी टाटा समूहाचा 18 वर्षांतील पहिला आयपीओ ठरणार आहे.
टाटा टेक आयपीओ बद्दल
टाटा टेक्नॉलॉजीज का इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे. या इश्यूद्वारे, टाटा मोटर्स 8.11 कोटी, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 त्यांचे 48.6 लाख शेअर्स आणि अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे.
टाटा टेकमध्ये टाटा मोटर्सची 74.69 टक्के, अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.26 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 ची 3.63 टक्के मालकी आहे.