दुकानातील गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करून जिल्हाधिकारी निर्णय देणार
वार्ताहर /अगसगे
अगसगे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. याप्रकरणी रेशन दुकानाच्या सेपेटरीने न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. या सर्व प्रकरणाची मंगळवार दि. 26 रोजी जिल्हाधिकाऱयांच्या समोर चौकशी करून त्याचा निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे अगसगे परिसरातील जनतेचे याकडे लक्ष लागून आहे.
अगसगे प्राथमिक कृषी पत्तीन संघामार्फत अगसगे आणि चलवेनट्टी या दोन गावांना रेशन देण्यात येते. रेशन दुकानामध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची कुणकुण अन्न व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक जे. बी. बागोजीकोप यांना लागली होती. याची पाहणी करण्यासाठी दि. 1 जानेवारी 2022 रोजी रेशन दुकान क्र. 96 ला भेट दिली. यावेळी रेशन दुकानामध्ये असलेल्या साठय़ाचा हिशेब पाहिला. रेशन कार्डधारकांना वितरण केलेले रेशन आणि गोडावूनमध्ये असलेल्या साठय़ामध्ये मोठी तफावत आढळून आली. तब्बल 34 क्विंटल 45 किलो तांदूळ व 3 क्विंटल 44 किलो गहू जादाचा साठा आढळून आला. या प्रकरणी आहार निरीक्षकांनी याची माहिती तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना दिली. याचा संपूर्ण अहवाल दि. 3 जानेवारी रोजी पाठवून दिला होता.
या अहवालाची दखल घेऊन तहसीलदारांनी दि. 7 जानेवारी रोजी संबंधित कृषी पत्तीन सहकारी संघाच्या सेपेटरीला सात दिवसाच्या आत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र बेजबाबदार सेपेटरीने नोटिसीला काहीच उत्तर दिले नाही. यामुळे याचा संपूर्ण अहवाल तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे जिल्हा उपसंचालक बसवराज कोडली यांना पाठवला. त्यानुसार बसवराज कोडली यांनी रेशनदुकानदाराला जादा शिल्लक साठय़ाबाबत समर्पक उत्तर घेऊन तीन दिवसाच्या आत कार्यालयाला भेट देण्याची कारणे दाखवा नोटीस दि. 10 मार्च रोजी बजावली होती. याप्रकरणी रेशन दुकान क्र. 96 च्या सेपेटरीने समर्पक उत्तर न दिल्याने दि. 17 मार्च रोजी रेशन दुकानचा परवाना रद्द करण्याचा आदेश अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे जिल्हा उपसंचालक बसवराज कोडली यांनी बजावला होता.
या प्रकरणी यापुढे रेशन कार्डधारकांना सुरळीत रेशन पुरवठा व्हावा तसेच कार्डधारकांना त्रास होऊ नये म्हणून बोडकेनहट्टीच्या श्री दुर्गादेवी स्त्राrशक्ती संघाच्या रेशन दुकानाला अगसगे गावातील कार्डधारकांना रेशन पुरवठा करण्याचा आदेश तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी दि. 21 मार्च रोजी बजावला होता.
या आदेशाच्या विरोधात रेशन दुकानाच्या सेपेटरीने न्यायालयात स्थगितीसाठी खटला दाखल केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दि. 28 एप्रिलपर्यंत या खटल्याला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मंगळवार दि. 26 रोजी जिल्हाधिकारी आणि दंडाधिकाऱयांच्या न्यायालयात हजर रहावे, असे आदेशामध्ये म्हटले आहे. यामुळे दि. 26 एप्रिल रोजी काय होणार, याकडे अगसगे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
काटामारीचा प्रकार सुरुच
अगसगे रेशन दुकानामध्ये काटामारीचा प्रकार सुरू आहे. कार्डधारकांना बुट्टीचे वजन वजा न करता रेशन देण्यात येते. रेशन दुकानामध्ये दहा किलो दिलेले रेशन बाहेर वजन केल्यास आठ किलो येते. तर मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी न करता तसेच लग्न झालेल्या मुलीच्या नावे आलेले रेशन कार्डधारकांना न देता सेपेटरी स्वतः घेऊन जातो, असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. कायद्यानुसार मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आणि लग्न झालेल्या मुलींची नावे रेशन दुकानदार अन्न आणि नागरी पुरवठा खात्यामध्ये स्वतः जावून कमी करणे गरजेचे असते. मात्र तसे रेशनदुकानदार करीत नाहीत. यामुळेच जादा साठा आढळून आला आहे आणि तो साठा दरमहिना रेशन दुकानदार (सेपेटरी) काळय़ा बाजारात याची विक्री करतात, अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.