वृत्तसंस्था/ रोम
पुढील आठवड्यात येथे सुरु होणाऱ्या एटीपी टूरवरील इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून स्पेनचा अव्वल टेनिसपटू कार्लोस अल्कारेझने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
माद्रिद टेनिस स्पर्धेत खेळताना अल्कारेझच्या उजव्या हाताच्या तळव्याला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे त्याने माँटेकार्लो आणि बार्सिलोना टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. माद्रिद टेनिस स्पर्धेत रशियाच्या रुबलेव्हने अल्कारेझचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव केला होता. आता 26 मे पासून पॅरिस येथे सुरू होणाऱ्या प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अल्कारेझ खेळणार आहे.