बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरातील ख्रिश्चनांनी गुरुवारी ‘ऑल सोल्स डे’ साजरा केला. 2 नोव्हेंबर हा दिवस ख्रिश्चनांकडून दरवर्षी कुटुंबातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि ख्रिश्चन दफनभूमीत विशेष प्रार्थना केली जाते. स्मशानभूमी स्वच्छ करून सुशोभित केली जाते आणि आशीर्वाद दिला जातो. गुरुवारी सकाळी सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आल्या व सायंकाळी गोल्फ कोर्सजवळील दोन्ही स्मशानभूमी, शहापूर आणि आजूबाजूच्या गावांमधील दफन भूमीमध्ये ख्रिश्चनबांधव मोठ्या संख्येने जमले होते. गोल्फ कोर्स शेजारील स्मशानभूमीत ख्रिस्ती बांधव त्यांच्या कुटुंबीयांच्या दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. सेंट पॉल हायस्कूलचे उपप्राचार्य फादर सेबॅस्टियन परेरा हे मुख्य सेलिब्रंट होते. इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चचे फादर डिसोझा आणि समिती सदस्यांनी विशेष प्रार्थनेसाठी स्मशानभूमी तयार करण्यासाठी प्रयत्न केले. फादर विजय मेंडिथ, फादर मायकेल फर्नांडिस, फादर प्रशांत कुमार आणि फादर सिरिल ब्रॅग्स यांनी विशेष प्रार्थना करण्यात भाग घेतला. कॉयर सदस्यांनी प्रार्थनागीते सादर केली. शहरातील ख्रिश्चनांसह गोव्यातील ख्रिश्चनांनी येथे प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला होता.
Previous Articleराजहंसगडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा
Next Article नेहरूनगर येथे सांडपाणी रस्त्यावर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.