मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय : सार्वजनिक हित अधिक महत्त्वाचे
प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोपा विमानतळ राष्ट्रीय महामार्ग 66 ला जोडणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्थानिक कायदे जेवढे पाळता येतील तेवढे पाळून लिंक रोडचे काम हाती घेण्यात आले. वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हित अधिक महत्त्वाचे, अशी टिपण्णी करून मुंबई उच्च न्यायालयाने मोपा लिंक रस्ता प्रकरणी सादर झालेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
हा लिंक रोड फक्त 8 किलोमीटर अंतराचा आहे. तरीपण त्याच्यासाठी 46. 6693 हेक्टर जमीन कशाला ताब्यात घेतली जात आहे, असा प्रश्न करण्यात आला होता. धारगळ, वारखंड, कासारवर्णे या गावातील जमीन रस्त्यासाठी घेण्यात आली. हा रस्ता मोपा विमानतळाच्या मुख्य प्रकल्पाचा भाग नव्हता. प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला घेतल्यानंतर या लिंक रोडची संकल्पना आली. त्यामुळे या लिंक रस्त्यासाठीही पर्यावरणीय ना हरकत दाखला घेणे आवश्यक होते, असा दावा करण्यात आला होता. आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी दुसरा पर्यायी रस्ता शक्य आहे का, जेणे करून रस्ता रुंदीकरणात पाडावी लागणारी बांधकामे वाचली जाऊ शकतील, असा प्रश्न न्यायपीठासमोर मांडला होता.
जनहिताच्या नावाखाली जमीन हिसकावली : यांचिकादारांची बाजू
गावातील लोकांची 4 लाख 9 हजार 516 चौ.मी. जमीन जनहिताच्या नावाखाली जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतींनी दर्शविण्यात आलेला विरोध विचारात न घेता सर्व नियम धाब्यावर बसवून कायदा मोडून जमीन ताब्यात घेण्यात आली. जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया 2008 साली सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत लोकांच्या ना हरकती ऐकून घेण्याची व्यवस्था होती पण हरकती ऐकून न घेता तातडीचे कलम लावून दि. 23 सप्टेंबर 2020 रोजी जमीन ताब्यात घेण्यात आली. हे योग्य नसल्याची बाजू मांडण्यात आली होती.
प्रदीप यशवंत कानोळकर, शिवाजी हरिश्चंद्र राऊळ, प्रकाश पालयेकर, चंद्रकात कोनाडकर, प्रशांत महादेव शिरोडकर, मंगेश बागकर, प्रशांत चंद्रकांत साळगावकर, जनार्दन गणेश तुळसकर, चंद्रशेखर रघू तुळसकर, महेश बाळा तुळसकर, नारायण सखाराम तुळसकर, संतोष सुरबा तुळसकर, राजेंद्र हरिश्चंद्र तुळसकर, अरुण मधूकर तुळसकर, विद्याधर विश्राम तुळस, मोहन रामा साळगावकर, अर्जुन जयराम साळगावंकर, साजो नवसो तुळसकर, रुपेश नीळकंठ तुळसकर, दीपक मनोहर तुळसकर, पुंडलिक पांडुरंग तुळसकर, लाडू साजो तुळसकर, प्रज्योती प्रकाश तुळसकर, गोकुळदास चंद्रोजी तुळसकर, सखाराम मुकुंद तुळसकर, भागिरथी रामचंद्र तुळसकर, जनार्दन गणेश तुळसकर, प्रशांत चंद्रकांत साळगावंकर, संतोष सुरबा तुळसकर, अर्जुन जयराम साळगावंकर, रुपेश नीळकंठ तुळसकर, पुंडलिक पांडुरंग तुळसकर, प्रज्योती तुळसकर, नवसो तुळसकर, रेखा जयराम तुळसकर, तुळशीदास लाडू मयेकर, ज्ञानेश्वर नवसो तुळसकर, रामा सुकडो हरिजन, सागर रामा नाईक, गुरुदत्त अनंत तुळसकर, अंकुश अनंत आरोंदेकर, संजय मनोहर नाईक, विशांत दिलीप मांद्रेकर, रामा वसंत आरोंदेकर, अनंद बाळा केरकर, मोहन शिवाजी तुळसकर, मुकुंद वासू तुळसकर, या एकूण 49 जणांनी याचिका सादर करून मोपा लिंक रोडला आव्हान दिले होते.