सुरत / वृत्तसंस्था
‘अमूल’ने शनिवारी दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. कंपनीने देशपातळीवर दूधदरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर आता अमूलचे दूध 63 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली होती. तसेच 28 फेब्रुवारी रोजी कंपनीने दूधदर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले होते. आताच्या दरवाढीमागील कारण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, उत्पादनखर्च वाढीमुळे दरवाढ करण्याची माहिती मागच्यावेळी देण्यात आली होती.