वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया (अमेरिका)
येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेकने बिनाका अँड्रेस्क्यूचा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
सोमवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात स्वायटेक बिनाका अँड्रेस्क्यूचा 6-3, 7-6(7-1) असा पराभव केला. स्वायटेकचा आता पुढील फेरीतील सामना बुधवारी इमा राडूकेनूशी होणार आहे. 20 वर्षीय राडूकेनूने 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.