सैनिकाच्या भूमिकेत आयुष्मान खुराना
स्वतःच्या चित्रपटांमध्ये वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारणारा अभिनेता आयुष्मान खुराना सध्या चर्चेत आहे. तसेच तो स्वतःच्या चित्रपटांच्या विषयातून समाजातील रुढिवादी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आगामी चित्रपट ‘अनेक’ आता 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले असून यात आयुष्मानच्या हातात रायफल दिसून येते. तसेच पोस्टरवर ‘जीतेगा कौन? हिंदुस्थान’ असे लिहिलेले आहे.
या चित्रपटात अभिनेता सैनिकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन आणि बनासर मीडिया वर्क्स, टी-सीरिजकडून निर्मित या चित्रपटाचे चित्रिकरण ईशान्य भारतात करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना वाढविणार असल्याचे उद्गार आयुष्मानने काढले आहेत.
आयुष्मान हा ऍन ऍक्शन हीरो या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रिकरण करून अलिकडेच परतला आहे. याचबरोबर तो डॉक्टरजी या चित्रपटात तो रकुल प्रीत सिंहबरोबर दिसून येणार आहे.