वाकरे प्रतिनिधी
वाकरे ता करवीर येथील शेतकरी सरदार राउसो माने यांच्या अवघ्या ८४ दिवसांच्या खिल्लार जातीच्या पाडीचा लंपी आजाराने बुधवारी मृत्यू झाला, त्यामुळे लंपी स्किन आजाराची दाहकता वाढली आहे.
गेले अनेक महिने कुंभी- कासारी परिसरातील अनेक गावांमध्ये जनावरांना लंपी स्कीम या त्वचा रोगाची लागण झालीआहे. या आजारामुळे गायी, म्हैशीसारखी दुभती जनावरे याला बळी पडत आहेत. लंपी स्किन आजारामुळे या परिसरात अनेक गाई म्हशींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी संकट कोसळले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेली जनावरे मृत्यू पावत असल्याने शेतकरी वर्ग हादरून गेला आहे. यातच बुधवारी सरदार माने यांच्या ८४ दिवसांच्या खिल्लार जातीच्या पाडीचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याने आता हा रोग लहान वयातील जनावरांपर्यंत पोहोचला आहे. याबाबत गोकुळ व शासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गात होत आहे.