गरजूंना दरमहा दिले जाते रेशन किट
बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या ’वृद्धांना आधार’ या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अंतर्गत दरमहिना हे रेशन कीट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम संजीवीनीचे कर्मचारी करत असतात. वर्षपूर्ती निमित्त सर्वच ज्येष्ठांना फौंडेशनमध्ये आमंत्रित करून रेशन कीट सुपूर्द केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर सरिता पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ होत्या. प्रारंभी जयश्री ढवळी आणि शिल्पा बुदीहाळ यांनी एकदंताय वक्रतुंडाय हे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सरिता सिद्दी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. देगीनाळ यांनी प्रमुख पाहुण्या सरिता पाटील यांचा सत्कार केला. प्रास्ताविक करताना सीईओ मदन बामणे यांनी अनेकांनी सढळहस्ते मदत केल्याने हे कार्य सहज शक्मय झाल्याचे सांगितले. गेल्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुरू केलेल्या संजीवीनी ’वृद्धांना आधार’ उपक्रमाचा उद्देश हा गरीब आणि उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुरक्षित करणे आहे. त्यांच्या मूलभूत गरजा, दोन वेळचे जेवण, त्यांना लागणारी औषधे, गरज भासल्यास ऊग्णालयाला घेऊन जाणे, कायद्याची मदत अशा अनेक गोष्टी आहेत.
त्यापैकीच एक संजीवीनी मासिक रेशन सपोर्ट सुरू करण्यात आले असून बेळगावमधील शक्मय तितक्मया उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत साहित्याचे कीट प्रत्येक महिन्याला देण्यात येत आहे, असेही मदन बामणे यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्या सरिता पाटील बोलताना म्हणाल्या की अनेक संघटना अथवा वैयक्तिकरित्या कोणत्याही कार्याची सुऊवात केली जाते पण त्यात सातत्य रहात नाही पण संजीवनी फौंडेशनने सातत्याने आपली वृद्धांना आधार ही योजना सुरू ठेवली आहे हे कौतुकास्पद आहे. अनेक संस्था देणगीदारांवर अवलंबून असतात तर संजीवीनी फौंडेशन स्वत:हून गरजूंना मदत करत आहे. अशीच उत्तरोत्तर आपल्या हातून समाजाची सेवा घडत राहो असेही त्या म्हणाल्या. फौंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनाळ यांनी अध्यक्षीय समारोप करताना संजीवीनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती देऊन मानसिक ऊग्णांसाठीही काळजीकेंद्र सुरू केल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व लाभार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवर तसेच विजय पुनगे, डॉ सुरेखा पोटे, डॉ नवीना शेट्टीगार, यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा शांता मेलगे आणि प्रीती चौगुले यांच्याहस्ते रेशन कीट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी केले. विजयालक्ष्मी पाटील यांनी आभार मानले.