2009 च्या खून प्रकरणात दोषी, आज शिक्षा सुनावणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील गॅगस्टर-नेता मुख्तार अन्सारी याला आणखी एक धक्का बसला आहे. गुऊवारी खासदार-आमदार न्यायालयाने त्याला हत्येच्या एका प्रकरणात दोषी घोषित केले आहे. याप्रकरणी 27 ऑक्टोबर रोजी न्यायालय आपला निकाल देणार आहे. 2009 मध्ये त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2009 मध्ये कारंडा पोलीस स्थानक हद्दीत कपिलदेव सिंह यांची हत्या झाली होती. त्यानंतर मुहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीर हसन याने मुख्तार अन्सारीविऊद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी 2010 मध्ये सुरू झाली. या खटल्यातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मुख्तार अन्सारी याला दोषी घोषित करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतीच मनी लाँड्रिंग प्रकरणात उत्तर प्रदेशातील गुंड-नेता मुख्तार अन्सारीची जमीन, एक इमारत आणि बँक खाते जप्त केले होते. ज्याची किंमत 73.43 लाख ऊपये असल्याचे सांगण्यात आले. या संलग्न मालमत्तांमध्ये गाझीपूर जिह्यातील सदर तहसीलमधील मौजा राजदेपूर देहाती येथील 1,538 चौरस फूट जमीन आणि मऊ जिह्यातील सदर तहसीलमधील मौजा जहांगीराबाद येथे बांधलेली व्यावसायिक इमारत समाविष्ट आहे. तसेच त्यात परगणा येथील 6,020 चौरस फुटाच्या भूखंडाचा समावेश आहे.