शिये वार्ताहर
शिये (ता.करवीर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात रेडकु ठार झाले. पंधरा दिवसांत दोन वासरे , दोन रेडके असे चार पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज पहाटेच्या अनिल पाटील यांच्या शेडमधील बांधलेले रेडकू बिबट्याने ठार केले.त्या ठिकाणी वनरक्षक कृष्णात दळवी व भादरी यांनी भेट दिली.त्यावेळी वनविभागाच्या धोरणाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.यावेळी शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया कळविण्यासाठी वनरक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला असता एक वेळ फोन घेतला त्यानंतर फोन बंद केला.त्यामुळे वनरक्षकांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली.