ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चिंचवडचे भाजप आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, मविआकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, कलाटे यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली असतानाच कलाटेंना मदत करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह अन्य सात जणांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक मविआने जोर लावल्याने चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच ठाकरे गट चिंचवडमध्ये आक्रमक झाला असून, त्यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
अधिक वाचा : शिवनेरीवरील भगव्यासाठी राज्यव्यापी आंदोलन