नागोवा येथील श्री नागेश महामाया देवस्थानतर्फे देणगी कुपन
प्रतिनिधी /राय
नागोवा (सासष्टी) येथील श्री नागेश महामाया देवस्थानने हाती घेतलेल्या अग्रशाळा बांधकामाच्या पूर्णत्वासाठी निधीची गरज असून समाजातील दानशूर सदस्यांना त्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.
निधी उभारण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून देवस्थान कमिटीने 100 रुपयांची देणगी कुपन जारी केली आहेत. या देणगी कुपनांचा शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि इतर सदस्य उपस्थित होते.
देणगी कुपनाचे दर्शनी मुल्य 100 रुपये असून या देणगी कुपनाचा छपाई खर्च ऍन इन्स्टिटय़ुटचे संचालक आनंदराव नागवेकर यांनी केलेला आहे. आनंदराव नागवेकर हे महामाया देवीचे भक्त असून महामाया देवीची महती समाज बांधवांना व्हावी म्हणून यासाठी टीव्ही कलाकार सारिका शिरोडकर यांच्यासमवेत खास व्हिडिओ प्रसारित करुन त्यांनी यापूर्वीही मदतीसाठी आवाहन केले होते.
गोव्यातील तसेच गोव्याबाहेर असलेल्या समाजातील दानशूर बांधवांनी या उपक्रमासाठी आपली देणगी युको बँकेच्या म्हापसा शाखेत देवस्थानच्या नावाने 13030110029060 या खात्यात ( आयएफसी कोड युसीबीए0001303) किंवा दत्तप्रकाश नागवेकर (9822486648) यांच्याकडे संपर्क साधावा असे यावेळी आवाहन करण्यात आले.