भारतीय बाजारपेठेत विस्तार कण्यासाठी कंपनी निर्णय घेण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन बनवणारी कंपनी अॅपल पुढील 4-5 वर्षांमध्ये म्हणजेच 2027-28 पर्यंत 5 पटीने उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 7 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 58,166 कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले आहे. यामध्ये वाढ करून कंपनी 40 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3.32 लाख कोटी रुपये कमविण्याची योजना आखत आहे.
अॅपल भारतात एअरपॉड्सदेखील बनवणार
अॅपल सध्या फक्त भारतातच आयफोन बनवते, परंतु पुढील वर्षापासून ते एअरपॉड्सचे उत्पादनही सुरू करणार आहे. अॅपलशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी सध्या येथे आयपॅड किंवा लॅपटॉप बनवणार नाही.
आयफोन विक्री कमी
कंपनीने 25 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात जागतिक स्तरावर 15.87 लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन आणि 3.19 लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन आणि वेअरेबल आणि होम अॅक्सेसरीजची विक्री केली. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या तीन तिमाहीत (30 सप्टेंबर 2023 पर्यंत) कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे.