मलप्रभा क्रीडांगणावर भव्य कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी / खानापूर
माजी आमदार अरविंद पाटील यांचा 54 वा वाढदिवस आज शुक्रवार दि. 17 रोजी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. मलप्रभा क्रीडांगणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील सत्कार सोहळा समितीच्यावतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी येथील मलप्रभा क्रीडांगणावर भव्य शामियाना उभारण्यात आला असून या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून दुपारी 2 वाजता येथील शिवस्मारकात शिवपुतळ्याला अभिवादन त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन, जांबोटी नाका येथे बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 3 वाजता क्रीडांगणावर 54 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी वाढदिवस सत्कार समितीच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी राज्यस्तरीय व जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध उपक्रमानी हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष बाबुराव देसाई, सदस्य मल्लाप्पा मारीहाळ, विठ्ठल पाटील, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई, पंडित ओगले, महारुद्र हिरेमठ, वासंती बडगेर, राजश्री देसाई, मारुती टक्केकर, विरेश देवरमणी, बाबासाहेब टक्केकर, लक्ष्मण बामणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.