आषाढी एकादशी दिवशी फक्त नमाज पठण केले जाणार; कुर्बानीचा कार्यक्रम शुक्रवारी
सातारा प्रतिनिधी
आषाढी एकादशी आणि मुस्लिम समाजाचा बकरी ईद हे दोन्ही सण गुरुवारी एकाच दिवशी आल्याने त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोरेगावातील मुस्लिम समाजाने घेतला आहे.
गुरुवारी घरी गोडधोड करून सण साजरा करू आणि शुक्रवारी शरियत प्रमाणे आणि मुस्लिम समाजाच्या रितीजिवाजाप्रमाणे कुर्बानीचा कार्यक्रम करू अशी ग्वाही समाज बांधवांनी दिली.. कोरेगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजबांधव आणि खाटीक समाज यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.