खेड प्रतिनिधी
शासनाकडून माफक फीमध्ये शिलाई मशिनसह घरघंटी, घरकुल मिळवून देतो, असे सांगून 839 महिलांची तब्बल 21 लाख 18 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संदिप शंकर डोंगरे याच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
संदीप डोंगरे याने महाराष्ट्र कामगार क्रांतीसेना या संघटनेचा युवाध्यक्ष असल्याचे सांगत महाराष्ट्र कामगार क्रांतीसेना संघटनेमार्फत शासनाकडून माफक फी मध्ये शिलाई मशिन, घरघंटी, घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यापोटी ठराविक रक्कम स्वीकारली.
मात्र दीड वर्षा कालावधी लोटून देखील एकाही महिलेला शिलाई मशिन, घरघंटी, घरकुल प्राप्त झाली नाही. याबाबत सातत्याने महिलांनी विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्या नंतर महिलांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संदीप डोंगरे याच्यावर 7 जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.