ओटवणे / प्रतिनिधी-
सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेत मुंबई मालाड येथील कु. अथर्व उदय गिरकर प्रथम याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत व्दितीय क्रमांक कु. वृत्तीका कृष्णा परब- (भांडुप -मुंबई), तृतीय क्रमांक कु. जय समिर राऊळ (पिंगुळी, सिंधुदुर्ग) यांनी पटकाविला.
विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.