Atharvashirsha recitation activity by students of Bhandari High School during Maghi Ganeshotsav in Malvan
मालवण माघी गणेश चौक येथील सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्या वतीने साजरा केला जाणारा पंचेचाळीसव्या माघी गणेश उत्सव आणि मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होत असतानाच गेले तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. आज माघी गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या चौथ्या दिवशी श्री गणेशाला सहस्त्र मोदकांचा नैवेद्य गणेश भक्तांनी अर्पण केल्यानंतर मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण करून श्री गणेशाची आराधना केली यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवण येथील माघी गणेश चौकात गेली पंचेचाळीस वर्ष सार्वजनिक माघी श्री गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तर यावर्षी श्री गणेश मंदिराचा सातवा वर्धापनदिन होत आहे या वर्धापनदिन सोहळ्यास २४ जानेवारी पासून सुरुवात झाली असून या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर युवा वर्गासाठी आकर्षक असे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहे. आज गणेश भक्तांनी श्रींच्या चरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण केला तर मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या इयत्ता सहावी मधील ५० मुला मुलींनी अथर्वशीर्ष पठण करून गणरायाची आराधना केली.
मालवण / प्रतिनिधी