वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पॅनिश फुटबॉल लीग स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अॅथलेटिक बिलबाओने गेटाफीचा 2-0 अशा गुणफरकाने पराभव केला. आता या स्पर्धेच्या गुणतक्त्यात अॅथलेटिक्स बिलबाओ पाचव्या स्थानावर आहे.
या सामन्यात अॅथलेटिक्स बिलबाओ संघातील इनाकी आणि निको विल्यम्स बंधुंनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. या सामन्यात अॅथलेटिक्स बिलबाओच्या व्हॅलवेरेडीला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदाना बाहेर काढल्याने बिलबाओ संघाला सामन्यातील शेवटच्या काही कालावधीत 9 खेळाडूंशी खेळावले लागले. या स्पर्धेत अॅथलिटको माद्रिद चौथ्या स्थानावर आहे. गेटापिला 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.